राज कपूर रशियाच्या विमानतळावर उतरले आणि जनतेनं टॅक्सीसहीत त्यांना खांद्यावर घेतलं !

Maharashtra Today

राज कपूर बॉलीवूडच्या हरहुन्नरी अभिनेत्यांपैकी एक नाव. अभिनयाच्या जोरावर त्यांनी फक्त भारतातच नाही तर जगभरात ओळख निर्माण केली. अनेक देशात आजही त्यांच्या नावाचे सिनेमे हाऊसफुल्ल होतात. असाच एक देश रशिया. भारतापासून ४९८३ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रशियात राज कपुर इतके प्रसिद्ध का होते? असा प्रश्न आजही अनेकांच्या मनात येतो. राज कपुर यांच्या तत्कालीन रशियातले अधिकारी, जनता आणि राजकारणी देखील प्रेम करायचे.

राज कपुर १९५४ साली मॉस्कोला जाणार होते. तेव्हा त्यांच्याकडे वीजा नव्हता. असं असतानासुद्धा त्यांना प्रवासात कोणतीच अडचण आली नाही. सोव्हिएत अधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं नाही. मॉक्सो विमानतळातून बाहेर पडून राज कपुर टॅक्सीची वाट पाहत होते. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी ओळखलं की ते राज कपुर आहेत. टॅक्सीत(Taxi) बसल्यानंतर अचानक त्यांना जणावलं की टॅक्सी पुढं जाण्याऐवजी मागं जातीये. राज कपूर यांनी बाहेर डोकावून पाहिलं तर लोकांनी चक्क त्यांच्या टॅक्सीला खांद्यावर उचलून घेतलं होतं. यावरुन राज कपुर यांच्या प्रसिद्धीची झलक पहायला मिळते.

‘आवारा’चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी राज कपुर रशियाला गेले होते. रशियात जेव्हा आवारा चित्रपट रशियन भाषेत प्रदर्शित झाला आणि या सिनेमानं प्रसिद्धीचं नवं आयाम गाठलं. राज कपुरांच्या रुपानं गरिबांचा नायक यशाचं प्रतिक बनला. या चित्रपटाचे ६ कोटी ४० लाखांहून जास्त तिकीटं सोव्हीयत युनियनमध्ये विकली गेली. सोवियत रशियात सर्वाधिक पाहिला गेलेला तिसरा मोठा चित्रपट राज कपुर यांचाच होता.

म्हणून रशियात राज कपुर इतके लोकप्रिय होते

भारतात चित्रपट सृष्टी उदयास येऊ लागली तेव्हा पासून भारत आणि रशियांतील सिनेमे एकमेकांशी जोडले गेलेत. स्वातंत्र्यानंतर भारत आणि सोव्हिएत संघाचे संबंध अधिक दृढ व्हावेत म्हणून सांस्कृतीक आदान प्रदानाचे कार्यक्रम वरचे वर आयोजित केले जायचे. यापैकी एक सिनेक्षेत्र होतं.

स्वातंत्र्याच्या आधीपासूनच भारत आणि रशियाचे संबंध चांगले होते. पंडीत नेहरूंनी हे संबंध अधिक दृढ केले. नेहरुंनी १९५०च्या कोरीया युद्धाच्या वेळी अमेरिकेचा दबाव झुडकारुन लावला. यामुळं सोव्हिएत संघाची मत भारताबद्दल चांगली बनली. स्टीलनचा १९५३ साली मृत्यू झाला सत्ता ताब्यात आली ख्रुश्चेव यांच्या. त्यांनी स्टॅलीन सारखी आक्रमक निती अवलंबली नाही. त्यांच्यामुळं अनेक युद्धांना विराम लागला. ते शांत स्वभावाचे होते. केलेचे चाहते होते. त्यांच्या काळात सोव्हिएत संघाला स्थिरता लाभली. इतर देशांशी संबंध सुधारण्यास मदत झाली. कला आणि संस्कृती विषयक त्यांनी नवी धोरणं अवलंबली. यामुळं भारतीय सिनेमासाठी रशियाची दारं उघडली. यामुळंच १९५४ साली रशियाला नवं मार्केट खुलं झालं.

राज कपुर यांच्याप्रमाणं, दिलप कुमार, देवानंद यांना रशियानं डोक्यावर घेतलं. राज कपुर आणि नर्गिसची जोडी रशियन जनतेला विशेष आकर्षित करायची. ‘श्री ४२०’ हा राज कपुरांचा चित्रपट रशियात तुफान गाजला. राज कपुर यांनी निभावलेल्या भूमिका रशियन लोकांना खास आवडत. त्यांच्यातली लढण्याची जिद्द आणि गरिबीतून मार्ग काढणारा नायक त्यावेळच्या रशियाच्या स्वप्नांच सकारात्म रुप होतं. रशियन जनता राज कपुर यांच्या रुपात रशियाच्या स्वप्नाला पडद्यावर बघायची असं अनेक समिक्षाकारांनी लिहून ठेवलंय.

भारत आणि रशियाची स्थिती एकसारखीच होती. त्याकाळात रशिया स्टॅलीनच्या क्रुर शासनातून मुक्त होऊन प्रगतीच्या वाटा शोधत होता. तर इंग्रजांच्या ताब्यातून स्वातंत्र्य मिळवणारा भारत नवनिर्मितीच्या ध्येयानं झपाटला होता. दोन्ही देशांची स्थिती सारखीच होती. संघर्षात स्थिरतेची स्वप्न ही राष्ट्रं पाहत होती. राज कपुर साध्या माणसाला पदड्यावर रंगावयचे. त्यांचीच गोष्ट सांगायचे. जनतेलाही हेच हवं होतं. संघर्षाच्या काळात एक आशावादी नायक.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button