‘राज’कारणाची दिशा बदलणार : राज ठाकरेंकडून लवकरच मोठ्या पक्षप्रवेश सोहळ्याची घोषणा

Raj thackeray

मुंबई :- मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अनेक पक्षांचे कार्यकर्ते प्रवेश करताना दिसून येत आहेत. आज नवी मुंबईच्या विविध पक्षातील शेकडो जणांनी मनसेत प्रवेश केला. काही वेळापूर्वी कृष्णकुंज येथे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray)उपस्थितीत या सर्वानी मनसेचा झेंडा हाती घेतला. यावेळी पक्षात येण्यासाठी झालेली कार्यकर्त्यांची गर्दी बघून राज ठाकरे यांनी लवकरच मोठा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे मनसे मोठा राजकीय भूकंप घडवणार असल्याची चर्चा रंगली आहे.

आज नवी मुंबईतील शेकडो जणांनी मनसेत प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या गळ्यात मनसेचा दुप्पटा घालून स्वागत केले. आपल्या पक्षप्रवेशामुळे मनसेची ताकद वाढेल यात शंका नाही. आज झालेली गर्दी बघून लवकरच यापेक्षाही मोठा असा पक्षप्रवेशाचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. दरम्यान, आजच्या पक्षप्रवेशामुळे आगामी नवी मुंबई महापालिकेत मनसे संपूर्ण ताकदीने आपले उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER