राजभवनाकडे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादीच नाही; नावे पाठवल्याचा आघाडीचा दावा

CM Uddhav Thackeray - Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा प्रलंबित आहे. परंतु, राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नाही, अशी माहिती राजभवनाच्यावतीने माहिती अधिकार (आरटीआय) अर्जावर देण्यात आली आहे.

राज्यपाल नियुक्त जागांवर आघाडीच्यावतीने नावे पाठवण्यात आल्याचा दावा केला होता. गेल्या ६ महिन्यांपासून हा मुद्दा राज्यपालांकडे प्रलंबित आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केला होता. पण याबाबत राजभवनाकडे आरटीआयअंतर्गत माहिती मागितली असता राजभवनने वेगळेच उत्तर दिले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नाही, अशी माहिती राजभवनाच्यावतीने माहिती अधिकार अर्जावर देण्यात आली आहे.

१२ राज्यपाल निवृत्त जागांवर एकनाथ खडसे (Eknath Shinde), आनंद शिंदे (Anand Shinde) , उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar), सचिन सावंत (Sachin Sawant) यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे फक्त नावापुरतीच चर्चेला होती का? ही नावे राजभवनाकडे पाठवण्यात आली की नाही, यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी २२ एप्रिल रोजी राज्यपाल सचिवालयाकडे माहिती मागितली की, मुख्यमंत्री महोदय/मुख्यमंत्री सचिवालय यांनी विधानपरिषदेवर सदस्य नियुक्तीसंदर्भात राज्यपालांना सादर केलेली यादी देण्यात यावी. तसेच सादर केलेल्या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती देण्यात यावी. यावर राज्यपाल सचिवालयाचे अवर सचिव जयराज चौधरी म्हणाले की, “राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची यादी जन माहिती अधिकारी (प्रशासन) यांच्या कार्यालयात उपलब्ध नाही.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button