शिवसैनिक, मनसैनिक आतुर ; बाळासाहेबांसमोर राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार

Raj and Uddhav Thackeray

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त काही वर्षानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्रदिसणार आहेत. या क्षणाची शिवसैनिक आणि मनसैनिक आतुरतेने वाट बघत असून सांयकाळी सहा वाजता हा क्षण प्रत्येक्षात उतरणार आहे. बाळासाहेबांच्या दक्षिण मुंबईतील पुर्णकृती पुतळ्याचे अनावरण आज म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी होणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी उपस्थित राहाणार आहे.

दक्षिण मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा समोरी वाहतुक बेटावर हा नऊ फुटी ब्रॉंझचा पुतळा उभारण्यात आला आहे. यासाठी 1200 किलो ब्रॉन्झ धातू वापरण्यात आला आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमीत्त या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

सर्व पक्षीय नेत्यांना यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही उपस्थीत राहाणार आहेत. विशेष म्हणजे उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे हे काही वर्षानंतर एकत्र दिसणार आहे. व्यासपिठावर येणार आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादाचा निर्मळ झरा!; हिंदुत्वाच्या चळवळीतील तपस्वी आणि आदरणीय नेते – फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER