
नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर नेहमी टीका करत असतात. या ओघात ते कधी – कधी लष्कराच्या जवांनांचाही अवमान करतात. यावरून संतापून हरयाणा सरकारमधील मंत्री आणि भाजपाचे नेते अनिल विज म्हणालेत, राहुल गांधी यांना सीमेवर मायनस तपमानात उभे करा, एक दिवसात सर्व ज्ञान मिळेल!
केंद्र सरकारवर टीका करताना तामिळनाडूमध्ये एका रॅलीमध्ये राहुल गांधी म्हणालेत, देशातील सरकारने शेतकरी आणि मजुरांचा विश्वास जिंकल्यास सीमांवर सैनिक तैनात करण्याची गरज नाही! भारतातील मजूर, शेतकरी, विणकर मजबूत आणि संरक्षित झाल्यास चीन भारताच्या भूभागात पाय ठेवण्याचं धाडस करणार नाही!!
या वक्तव्यासाठी राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात राहुल गांधी यांच्यावर टीका करताना अनिल वीज म्हणालेत, राहुल गांधी वारंवार देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा अपमान करत आहेत. ते काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना मायनस तपमानात तैनात करावे. देशाच्या शत्रूंचा सामना करण्यासाठी उभं राहिल्यावर एका दिवसात त्यांना सर्व ज्ञान मिळेल.
राहुल गांधी सीमाओं की रक्षा करने के लिए बार – बार सेना का अपमान कर रहे हैं और बहुत सारा ज्ञान भी बांट रहे है । क्यों न राहुल गांधी को ही सीमा पर माइनस तापमान में खड़ा कर दिया जाए सीमापार के दुश्मन का मुकाबला करने के लिए राहुल गांधी को एक दिन में ही सारे ज्ञान का पता लग जायेगा ।
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) January 25, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला