पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात अन् मलाईच्या गोण्या कंत्राटदारांच्या खिशात; भाजपचा आरोप

Ashish Shelar

मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी झाल्याने भाजपने शिवसेना आणि महापालिकेवर टीका केली आहे. तसेच महापालिकेत पाच वर्षांत एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याने महापालिका आणि शिवसेनेला घेरले. महापालिकेच्या भ्रष्ट कारभारावरच त्यांनी बोट ठेवले आहे. दरवर्षीप्रमाणे मुंबईत पाणी तुंबलंय.

नालेसफाई कधी १०७ % तर कधी १०४% झाल्याच्या दाव्यांचे आकडे मोठ-मोठ्याने वाझे. पहिल्या पावसातच ‘कटकमिशन’चे सगळे व्यवहार उघडे पडले. सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, नेमेची येतो पावसाळा. पाच वर्षांत एक  हजार कोटींचा घोटाळा, असा काव्यात्मक आरोप शेलार यांनी केला आहे. तसेच त्यांनी ट्विट करून मुंबईकरांना सल्लाही दिला आहे.

आता तरी मुंबईकरांची खरी काळजी करा

“डेब्रीजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात, पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात… आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात! आता तरी मुंबईकरांची खरी काळजी करा.” असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button