कर्नाटक सीमा भागात पावसाचा कहर

कर्नाटक सीमा भागात पावसाचा कहर

बेळगाव : सीमा भागातील निपाणी, चिक्कोडी, हुक्केरी, अथणी, कागवाड, रायबाग तालुक्याला पावसाने झोडपून काढले.चार दिवसापासून पुन्हा परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. या पावसामुळे (Heavy Rain) या तालुक्यातील अनेक गावांमधील घरांमध्ये पाणी शिरल्याने पडझड झाली. तर काही ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेकांना लाखो रुपयांचा फटका बसला.

द्राक्ष शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टी झाल्याने दोन महिन्यापूर्वी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचा पंचनामा सुरू असतानाच त्यामध्ये जीवित हानी होण्यासह पीक आणि मालमत्तेचीही मोठे नुकसान झाले. हुक्केरी शहराला पावसाच्या पाण्याच्या मोठा फटका बसला आहे. चिक्कोडी उपविभागातील शेतकरी पावसाच्या दणक्याने चिंताग्रस्त बनले असून रब्बी हंगामातील त्याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागले आहेत. अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या भाजीपाल्यासह सोयाबीन, ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. सीमाभागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER