पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील लाखो हेक्टर पिके धोक्यात

Heavy Rain - Crops

पुणे : यंदा परतीच्या पाऊसाचा प्रवास लांबला आहे. परतीचा पाऊस दिर्घकाळ आणि दमदार पडण्याची शक्यता आहे. अजून पुढील चार दिवस मुसळधार पावसाची (Heavy Rains) शक्यता व्यक्त केली आहे. परिणामी पश्चिम महाराष्ट्रातील (Maharashtra) खरीपाची काढणीला आलेली पिके धोक्यात आली आहेत. तसेच रब्बीची पेरणीवर संकट आहे. १५ लाख हेक्टरवरील पिके परतीच्या पावसामुळे अडचणीत आल्याने बळीराजा धास्तावला आहे.

कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), सातारा (Satara), पुणे (Pune) आदी जिल्ह्यात सर्वाधिक दहा लाख हेक्टर क्षेत्रात ऊस आहे. पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. गेल्या आठवड्यात अनेक वेळा आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उसाचे पिक आडवे झाले आहे. कोल्हापूर, सांगलीचा पश्चिम भाग, साताऱ्याचा दक्षिण भागातील सुमारे दोन लाख हेक्टरवर असलेले भाताच्या पिक पावसामुळे नुकसान होणार आहे. वाफ्याने आणि आडसाली उसाच्या लागणीसाठी सरी सोडून केलेले भुईमूग, सोयाबीन ही पिके पावसामुळे कुजण्याचा धोका आहे. काढणीला आलेले भात भिजल्यानंतर त्याचा रंग काळा पडतो. पाऊस सुरूच असल्याने पिकांच्या काढणीला विलंब होत आहे. अजून आठवडाभर पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस थांबल्यानंतर पुढील आठवडाभर काढणीसाठी वाट पहावी लागणार आहे. दरम्यान येणाऱ्या दसरा आणि दिवाळीच्या सणांमध्येच काढणीची कामे उरकून घ्यावी लागणार आहेत. जिल्ह्यात सरासरी १ ऑक्टोबरपासून रब्बीची पेरणी सुरू होते. ज्वारी, गहू, मक्का, सुर्यफूल, बाजरी, तिळ, कांदा, तेलबिया, भुईमूग, आदी पिकांची पेरणी झाली आहे. पाऊस लांबल्यास रब्बीचे पिकही धोक्यात येणार आहे. वादळी वाऱ्यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. अतिरिक्त पावसामुळे हळदीचे पिकही धोक्या आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER