इंद्रधनुषी साप ५० वर्षानंतर दिसला!

Rainbow snake

फ्लोरिडा : दुर्मीळ प्रजातीचा इंद्रधनुषी (बहुरंगी) साप फ्लोरिडात दिसला. या बातमीमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. हा पाण्यात राहणार बिनविषारी साप आहे. इंग्रजीत त्याला ‘रेनबो स्नेक’ म्हणतात.

अनेक वर्षांपासून आढळणारा हा साप गेल्या काही वर्षांपासून दिसेनासा झाला होता. फ्लोरिडाच्या ओकला राष्ट्रीय वनात ट्रॅकिंगसाठी गेलेल्या ट्रेसे कॉथेन यांना हा साप दिसला. तो सुमारे चार फूट लांब आहे. ‘ वाइल्डलाइफ रिसर्च इंस्टीट्यूट’ ने त्यांच्या फेसबुकवर ही माहिती फोटोसह दिली आहे.

हा बिनविषारी साप पाण्यात राहतो. पाणवठे कमी होत असल्याने या सापांची संख्या कमी होत गेली. आता तर ते दुर्मीळ झाले आहेत. फ्लोरिडाच्या ओकला राष्ट्रीय वनात हा साप दिल्याची नोंद ५० वर्षात पहिल्यांदा झाली आहे.

याबाबत ‘ फ्लोरिडा म्यूजियम ऑफ नैचुरल हिस्ट्री’ने म्हटले आहे की, १९६९ साली मैरियन काउंटी भागात हा साप दिसल्याची नोंद आहे.

हा साप दिसल्याबद्दल जीवशास्त्रद्यांनी म्हटले आहे की रॉडमैन रिजर्वायर भागात पाण्याची पातळी कमी झाल्याने तो या भंगात आला असेल. हा साप साधारण चार फूट पर्यंत लांब असतो. आतपर्यंत या प्रजातीचा सर्वात लांब साप साडेपाच फूट आढळल्याची नोंद आहे.


Page Tile : Rainbow snake appeared after 50 years

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)