पावसाचा परतीचा प्रवास पंधरा दिवसांनी लांबला

Monsoon.jpg

पुणे : सध्याची स्थिती पाहता मान्सूनचा प्रवास (Monsoon) लांबण्याचीच शक्यता अधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा कार्यरत असून, त्याचा प्रभाव कायम आहे.

यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास ल पंधरा दिवसांनी लांबणार आहे. यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याऐवजी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात मुक्काम ठोकून नंतरच तो परतीच्या प्रवासाला निघेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. हा पाऊस पुढील आठ दिवस कायम राहणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राजस्थानच्या दक्षिण भागापासून मान्सून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. सरासरी तारखांनुसार मान्सून दरवर्षी 1 सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू करतो. मात्र, यावर्षी हवामानशास्त्र विभागाने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख 17 सप्टेंबर सांगितली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER