कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पाऊस थांबला

Rain Stopped

सातारा : कोल्हापूर(Kolhapur), सांगली (Sangli) आणि सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. काल शुक्रवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असले तरी पावसाने उसंत घेतली आहे. पाऊस थांबल्याने पिकांच्या काढण्याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे. मात्र शेतात अजून पाणी असल्याने काढणी लांबणीवर पडणार आहे.

जिल्ह्यात गेली चार-पाच दिवस धुमाकूळ घातलेला पाऊस शुक्रवारी पूर्णपणे थांबला. ठिकठिकाणी चार दिवसांनी सूर्यदर्शन झाले. नद्यांची पाणी पातळीही ओसरू लागली आहे. परंतु शेती, रस्ते, पूल यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विविध ठिकाणच्या नुकसानीची पाहणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे पीक नुकसानीचे पंचनामे लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

चार दिवस परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नद्या, ओढे, नाले, बंधारे, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा, कोयना, कृष्णा, वारणा नद्यांची पाणी पातळी एका दिवसात 15 ते 25 फूट वाढली. नदीकाठचे हजारो विद्युत पंप पाण्यात बुडून शेतकर्‍यांना फटका बसला आहे. काही ठिकाणी पोट मळीची जमीन नदी पात्रात खचली आहे.

दुष्काळी भागातील येरळा, अग्रणी, माणगंगा, बोर या नद्यांना 25 ते 30 वर्षांनंतर पूर आला. अनेक ठिकाणी बंधारे फुटून जमिनी खचल्या. ओढ्यातील पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे पीक जमिनीसह वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी ऊस, द्राक्षे, डाळिंब, हळद, आले, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला ही पिके भुईसपाट होवून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तिन्ही जिल्ह्यातील 130 मार्गांचे नुकसान झाले आहे.

पाऊस कमी झाल्याने नद्यांची पाणी पातळी हळूहळू ओसरू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER