पावसाचा परतीचा प्रवास : तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट

The return journey of the rains began

पुणे : आज शनिवारपासून पुढील चार दिवस राज्यात मुसळधार परतीचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केले आहे. हे चार दिवस राज्यातील तेरा जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत आज शनिवार पासून13 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. उर्वरित राज्यात मात्र हलका पाऊस पडेल, असे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER