पाऊस मी.. गप्पा आणि गाणी

Rain me .. chats and songs

पाऊस आठवला की अनेकांना मस्त पाऊस , लॉंग ड्राईव्ह आणि गरमागरम चहा ! हे आपल्या प्रत्येकाला आठवतं. पाऊस आणि आपलं नात काही औरच असतं पण यंदा लॉक डाऊन आणि कोरोना मुळे घरच्या खिडकीतून हा पाऊस एन्जॉय करायला लागणार आहे. ” ओलाचिंब भिजण्याची मनी हवी हौस , त्यासाठी प्रथम मनात बरसाव मुसळधार पाऊस ” हे शब्द कुठेतरी तुम्ही या काही दिवसात सोशल मीडियावर एका कमालीच्या विडिओ मधून पाहिले असतील.अभिनेते ” विजय पाटकर ” यांनी ” पाऊस ” हा खास विडिओ आपल्या सगळया सोबत शेयर केला आहे. बघूया नक्की का आहे हा व्हिडिओ खास ….

या विडिओ बद्दल सांगताना विजय पाटकर म्हणतात ” जेव्हा पासून लॉक डाऊन सुरू झाला तेव्हा पासून माझी बायको सरोज मला सांगत होती तिला माझा ‘ माईम परफॉर्मन्स ‘ बघायचा. खरंतर मी पहिल्या सारखं बेस्ट माईम करू शकत नाही पण पुन्हा एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे म्हणून मी हा ” पाऊस ” विडिओ तयार केला. माईम च्या माध्यमातून मी पाऊस आणि आपलं एक अनोखं नातं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या साठी मला काही मित्रांनी मदत केली धनेश जुकर , शार्दूल पाटकर , शंतून सावंत यांच्या सगळयांच्या मदती मधून माझं ” माईम स्केच पाऊस ” हे साकारलं “

माईम ही एक अनोखी कला आहे ज्यातून आपण फक्त अभिनय करून आपल्याला जे काही सांगायचं , बोलायचं आहे ते फक्त आपल्या हालचाली मधून आपल्या चेहऱ्यावरील हाव भावांमधून सांगू शकतो. माईम हा खूप कल्पक अभिनयाचा आर्ट फॉर्म आहे म्हणून माईम मधून आपण अनेक नवनवीन विषय यातून मांडू शकतो. फक्त आपल्या चेहऱ्यावरील हावभावातून अभिनय कौशल्य साकारायला लागणारी अनोखी कला ही माईम मधून साकारली जाते. विजय पाटकर यांनी अनेक वर्षानी ही कला साकारली असली तरी त्यांच्या या अभिनय कौशल्यातून आणि या खास माईम मधून अनेकांनी पाऊस अनुभवला. पाऊस आणि आपलं नातं सांगण्याचा अनोखा प्रयन्त या निमित्ताने करण्यात आला आहे.

पावसात आपण अनेक गोष्टी अनुभवतो आणि त्या करण्यात काहींना मज्जा येते तर काहींना पाऊस हा खूप कटकटीचा वाटतो म्हणून या पावसाची अनोखी धम्माल सांगण्यासाठी अभिनेते विजय पाटकर यांनी हा खास माईम विडिओ तयार केला. सोशल मीडियावर या विडिओ वर अनेक प्रतिक्रिया आणि कॉमेंट्स चा वेगळा पाऊस पडला आहे आणि वाऱ्यासारखा हा व्हिडिओ व्हायरल देखील झाला. लॉक डाऊन मध्ये अनेक कलाकारांनी विविध गोष्टी केल्या कोणी लाईव्ह करून प्रेक्षकांच मनोरंजन केलं तर कोणीतरी गाण्याची मैफिल जमवत कवितांचा अनोखा थाट सोशल मीडिया वर साजरा केला तर इथे अभिनेते विजय पाटकर यांनी त्यांच्या खास माईम मधून आपल्याला पावसात चिंब भिजवलंय.

अभिनेता आणि दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका साकारणारे विजय पाटकर यांनी आजवर सिने – मालिका क्षेत्रात खूप कमालीची काम केली आहेत. मराठी सोबत हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनय कौशल्यांने प्रेक्षकांची मन जिंकून घेत प्रेक्षकांच खळखळून हसवून मनोरंजन करण्यात विजय पाटकर हे नेहमीच तत्पर असतात. धम्माल ३ , गोलमाल , सिंघम , तेजाब सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात त्यांनी आजवर खूप धम्माल काम केलं आहे. आपल्या अभिनयांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालून त्यांचं अखंड मनोरंजन विजय पाटकर हे करत असतात. अभिनयाच्या सोबतीने दिग्दर्शन क्षेत्रात देखील त्यांनी उत्तम काम केलंय.

आपल्याला फक्त एक अभिनेता म्हणून असलेला कलाकार हा जेव्हा काहीतरी नवीन कलाकृतीच्या माध्यमातून आपल्या समोर येतो तेव्हा नक्कीच आपण आश्चर्यचकित होतो. विजय पाटकर नेहमीच खूप उत्तम रोल साकारतात आणि त्यांनी ही माईम कला देखील तितकीच कमालीने साकारली आणि हा पाऊस आपल्याला अनुभवण्याची एक संधी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER