रत्नागिरीत लागणार ‘रेन कर्फ्यू’ !

Ratnagiri Rain

रत्नागिरी : हवामान खात्याने ११ आणि १२ तारखेला रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात २०० मिलीमीटर पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे.

खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी उल्लेखित दोन दिवस जिल्ह्यात कर्फ्यू लावण्याची घोषणा केली.

पत्रपरिषदेत मिश्रा म्हणालेत, १२ जून नंतरदेखील पावसाचा धोका कायम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाळ्यात जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर या तीन नगर पालिका आणि ३१ गाव धोकादायक आणि पूरग्रस्त असतात. या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. समुद्राच्या काठावर उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मोठ्या पावसाचा धोका असल्याने या भागातील ग्रामस्थांना हलवण्यात येणार आहे. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तु, औषधांचा साठा करून ठेवावा आणि बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

पुराचा धोका लक्षात घेऊन जनावरांना बांधून ठेवू नका, बोटी सुसज्ज ठेवा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कुशल मनुष्यबळ तैनात ठेवणे, लाईफ बोटी यासह इतर सामग्रीची तयारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.

कोविड सेंटरच्या ठिकाणी वीज खंडित झाल्यास जनरेटर पुरवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनचा बफर साठा देखील ठेवण्यात येणार आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत तुटवडा जाणवू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. गरज पडल्यास लगेच मदत करण्यासाठी बचाव पथकांनाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button