कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात अवकाळीचा दणका

सांगली : तीन दिवसांपूर्वी हवामान विभागाने वर्तवलेला अवकाळी पावसाचा (heavy rain) अंदाज खरा ठरला. कोल्हापूर (Kolhapur) , सांगली (Sangli) आणि साताऱ्यात (Satara) गुरुवार पहाटे जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

रात्री १ वाजल्यापासून विजांचा कडकडाट होत होता. रात्री २ वाजण्याच्या सुमारास हलका पाऊस सुरू झाला. यानंतर ३ वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. पहाटे काही काळ गारपीट झाली. सुमारे तासभर झोडपून काढल्यानंतर पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला. या अवकाळी पावसाचा शेतीला विशेषतः गहू पिकाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच पावसाचा जोर दिवसभर राहिल्यास ऊसतोड बंद होऊन त्याचा साखर कारखान्यांच्या गाळपावर विपरीत परिणाम होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER