येत्या ४८ तासांत पुण्यासह राज्यातील काही भागात पावसाची शक्यता

Heavy-rain

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यातील सर्वच भागांत रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी १९ आणि २० नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची (Heavy Rain) शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

खरंतर, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली पण १२ नोव्हेंबरपासून थंडी गायब झाली. यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत असून गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पुणेकरांनी आणि खासकरून शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात दक्षिण-पश्चिम पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तापमानात वारंवार वाढ होत आहे. यामुळे पुढील ४८ तासांत याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टयात होणार आहे. त्यानंतर म्हणजेच २१ नोव्हेंबरच्या सुमारास हा पट्टा ओमानच्या दिशेने पुढे सरकेल.

या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. याबरोबरच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीच्या प्रभावामुळे राज्यातील तापमनात वाढ झाली असून थंडीचा कडाका कमी झाले. त्यामुळे रोज अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये अजूनही नागरिकांनी गर्मीचा सामना करावा लागतो.

दरम्यान, राज्यात पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी. वेळीच तो कोरड्या जागी नेऊन ठेवावा अशा सूचना हवामान खात्याकडून करण्यात आल्या आहे. राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे तर दुसरीकडे दिवाळीचा उत्साह आहे. अशात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER