विदर्भात ६ सप्टेंबरनंतर पुन्हा पाऊस

Heavy Rains

मुंबई : ६ सप्टेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा मान्सूनचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. शुक्रवारी मुंबईत चांगले ऊन तापले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्रात ५ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ६ सप्टेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. ७ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ८ सप्टेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

५ आणि ६ सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळी, रात्री आकाश ढगाळ राहील. रिमझिम पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER