
सांगली : किसान रेल्वेनंतर आता रेल्वे मंत्रालय शेतकऱ्यांसाठी रेल्वे स्थानक परिसरात कार्गो टर्मिनल उभे करणार आहे. कार्गो टर्मिनलमध्ये कोल्ड स्टोअरेजची सोय असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला नाशवंत शेतमाल साठवून ठेवता येणे सहज शक्य होणार आहे. पीपीपी मॉडेलअंतर्गत याची उभारणी केली जाईल. जागा मात्र रेल्वेची असणार आहे. कोल्हापूर व सांगली येथे हे कोल्ड स्टोअरेज होणार आहे.
पुणे विभागातील कोल्हापूर, सांगलीमध्ये रेल्वे मालधक्का आहे. सांगली मालधक्क्याचा विकास पीपीपी मॉडेलअंतर्गत केला जाणार आहे. यासाठी टेंडर प्रक्रियादेखील लवकरच राबविली जाणार आहे. याच ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोअरेजची सोय केली जाण्याची शक्यता आहे. मागील महिन्यापासून रेल्वे बोर्डने याची चाचपणी सुरू केली आहे. कोणत्या स्थानकावरून माल मोठ्या प्रमाणात लोड होतो, हे पाहिले जात आहे. ज्या स्थानकावरून मालाचे जास्त लोडिंग होते, त्या ठिकाणी असणाऱ्या माल धक्क्याजवळ कोल्ड स्टोअरेजची सोय असलेले कार्गो टर्मिनल बांधले जाणार आहे. पीपीपी मॉडेलअंतर्गत याची उभारणी केली जाणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला