रेल्वेचे खासगीकरण होणार; राहुल गांधी संतापले

Rahul Gandhi got angry

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. १०९ मार्गांवर खासगी सेवा सुरू करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. या ठरावीक मार्गांवर दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या आधुनिक १५१ रेल्वेगाड्या खासगी तत्त्वावर चालवण्याची रेल्वेची योजना आहे. त्यासाठी खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयावर कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे.

रेल्वे ही गरिबांची एकमेव जीवनरेखा आहे आणि सरकार ती त्यांच्याकडून हिसकावून घेत आहे. जे काही हिसकवायचे, ते हिसका. पण लक्षात ठेवा – देशातील लोक योग्य उत्तर देतील, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, यातून भारतीय रेल्वेला ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या योजनेद्वारे प्रथमच प्रवासी रेल्वेगाड्यांसाठी खासगी क्षेत्राला आमंत्रित करण्यात येत आहे. रोजगारनिर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यावर होणाऱ्या देखभाल खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने खासगी क्षेत्राला रेल्वेने आमंत्रित केले आहे. प्रवाशांना वर्ल्ड क्लास अनुभव आणि सुरक्षित प्रवास देण्याबरोबर यातून रोजगार निर्मितीही होईल, असे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला राहुल गांधी यांनी प्रखर विरोध दर्शवला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाला राहुल गांधी यांनी प्रखर विरोध दर्शवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER