रेल्वेचा मुंबईकरांना दिलासा, आजपासून लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

Mumbai-local

मुंबई : रेल्वे सर्वसामान्यांसाठी कधीपासून सुरू करणार, याबाबतचं प्रशचिन्ह अजूनही कायम आहे. कारण आता रेल्वे राज्य सरकारच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने सर्वांसाठी लोकल सेवा (Local Train) सुरू करावी, असा प्रस्ताव रेल्वेला पाठवत माहिती मागविली होती. मात्र आम्ही राज्य सरकारला माहिती दिली असून त्यावर राज्य सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा आहे, असे सांगत रेल्वेने प्रवासाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टोलवला आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेनं याबाबत आज एक संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार मुंबई (Mumbai) उपनगरीय लोकल मार्गावरील विशेष लोकलच्या एकूण फेऱ्यांच्या संख्येत आजपासून २०२० फेऱ्या सुरु केल्यानंतर आज पुन्हा एकदा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनानं करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व सोशल डिस्टनसिंग हे सर्व मुद्दे लक्षात घेत लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आजपासून २०२० फेऱ्या सुरू केल्यानंतर, उद्यापासून त्यात ७५३ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. सोमवारी एकूण २७७३ फेऱ्या चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ५५२ तर पश्चिम रेल्वेवर २०१ फेऱ्यांची वाढ करण्यात आली. या लोकल फेऱ्यांमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि महिला प्रवाशांना प्रवासाची मुभा असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER