२०१९-२०२० मध्ये जवळपास एक कोटी रेल्वे प्रवाशांचे तिकीट रद्द

railway

नवी दिल्ली : २०१९-२०२० मध्ये प्रतीक्षा यादीतील एक कोटीहून अधिक प्रवासी तिकिटे खरेदी करूनही रेल्वेने प्रवास करू शकले नाहीत. आरटीआय अंतर्गत दाखल केलेल्या चौकशीत असे स्पष्ट झाले की, देशातील व्यस्त मार्गावरील गाड्यांची संख्या कमी असल्याने वेटिंगमध्ये असलेल्या प्रवाशांनी तिकिटे रद्द केलीत.

आरटीआय उत्तरात असे म्हटले आहे की, २०१९-२०२० मध्ये एकूण ८४,६१,२०४ प्रवाशांची आरक्षण केले होते. ज्यात १.२५ कोटी लोक प्रवास करणार होते. मात्र वेटलिस्ट झाल्यामुळे त्यांचे तिकीट आपोआप रद्द झाले होते. रेल्वे मंत्रालयाने प्रथमच खासगी गाड्या सुरू केल्याने रेल्वे प्रवासासाठी प्रतीक्षा यादी कमी करण्याच्या उपाययोजना केल्या आहेत.

रेल्वेने विशेष मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त असणार्‍या विशेष क्लोन गाड्यादेखील सुरू केल्या आहेत. या गाड्यांचा थांबा आणि वेगवान वाहतुकीचा कालावधी मर्यादित आहे. त्यांच्याकडे प्रामुख्याने तीन-स्तरीय एसी कोच आहेत आणि त्याच मार्गावर आधीच धावणाऱ्या विशेष गाड्या पुढे धावतील. या क्लोन गाड्यांचा आगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) १० दिवसांचा आहे.

प्रवाशांची प्रतीक्षा यादी आणि तिकिटांचे स्वयंचलितरीत्या रद्द करणे ही अनेक वर्षांपासून रेल्वेची मोठी समस्या आहे. राष्ट्रीय वाहतूक करणारे त्यांच्या वाढत्या ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यास अक्षम आहेत. पीएनआर रद्द झाल्यानंतर तिकीट भाडे प्रवाशांना परत केले जाते. चंद्रशेखर गौर यांना आरटीआयच्या उत्तरात सांगण्यात आले की, गेल्या पाच वर्षांत सुमारे पाच कोटी पीएनआर आपोआप रद्द करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER