
पुणे :- कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेससह (विशेष ट्रेन) यासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हजूर साहिब नांदेड, पुणे-हजूर साहिब नांदेड, लोकमान्य टिळक टर्मिनस- सिकंदराबाद, पनवेल-हजूर साहिब नांदेड या विशेष ट्रेन व अमरावती-तिरुपती उत्सव विशेष गाड्यांचा आरक्षण कालावधी चार महिन्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. आरक्षण कालावधी १० दिवसांवरून १२० दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे या गाडीचे पुढील चार महिन्यांतील आरक्षण करता येणार आहे. दि. १० फेब्रुवारीपासून ही सुविधा सुरू होणार आहे.
लॉकडाऊनमुळे २६ मार्च २०२० पासून रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. टप्प्याटप्प्याने ही वाहतूक सुरू केली जात आहे. कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस विशेष ट्रेन म्हणून दि. ३ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. विशेष ट्रेन म्हणून सुरू करण्यात आलेल्या गाड्यांत आरक्षित तिकिटावरच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. आरक्षण तिकिटे काढण्याचा कालावधीही दहा दिवसांचा देण्यात आला आहे. यामुळे जास्तीत जास्त दहा दिवसांतले तिकीट आरक्षित करता येत आहे. मध्य रेल्वेने सहा गाड्यांचा आरक्षण कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसचाही समावेश आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला