रेल्वेकडून मोठा दिलासा, राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी

मुंबई : कोरोना विषाणूचा (Coronavirus) फैलाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे (Lockdown) निर्बंध आता बऱ्यापैकी हटवण्यात आले आहेत. केंद्राने जारी केलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने सोमवारी (३१ ऑगस्ट) ‘अनलॉक-४’ च्या लाईडलाईन्स जारी केल्या. या गाईडलाईन्समध्ये आंतरजिल्हा प्रवासाला आवश्यक असणारी ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गाईडलाईन्सच्या आधारावर मध्य रेल्वेने परिपत्रक जारी करत राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला (Railway) परवानगी देत असल्याची माहिती दिली आहे.

सध्या राज्यात विशेष २०० रेल्वे गाड्यांचं संचालन होत आहे. या गाड्यांमधून प्रवास करण्यास सर्वसामान्य नागरिकांना परवानगी नव्हती. मात्र, आता राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनाही रेल्वेने प्रवास करता येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाधिक रेल्वे गाड्या चालवण्याची तयारी केली जात आहे. रेल्वे प्रवासासाठी सर्वसामान्यांना ऑनलाईन तिकीट बुकिंग करणं जरुरीचं आहे. प्रवाशांना 2 सप्टेंबरपासून रेल्वे बुकिंग करता येणार आहे. त्यासाठी या रेल्वे गाड्या जिथून सो़डल्या जातील आणि जिथे पोहोचतील अशा राज्यांच्या सरकारांकडे रेल्वेकडून संपर्क साधला जात आहे. या राज्यांकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर या अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याची औपचारिक घोषणा केली जाईल. मात्र किती विशेष रेल्वे सोडल्या जातील याची माहिती प्रवक्त्याने दिलेली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार किमान १०० विशेष गाड्या सोडल्या जातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER