शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला उजळला रायगड

Raigad - Shiv Jayanti

रायगड :- छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) ३९१ व्या जयंतीनिमित्त राजधानी किल्ले रायगड (Raigad) पूर्वसंध्येला नेत्रदीपक विद्युत रोशनाईने उजाळून निघाला. अनेक दिवस अंधारात असणार्‍या वास्तू प्रकाशमान झाल्या. राजसदरसह रायगडवरील विविध वास्तूंना रंगीबेरंगी रोशनाईने वेगळी झळाळी मिळाली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी किल्ले रायगडला भेट दिली होती. यावेळी रायगडवरील महत्त्वपूर्ण वास्तू, छत्रपती शिवरायांची मूर्ती अंधारात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तातडीने त्यांनी पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. रायगडवर विद्युतची व्यवस्था करण्यासाठी मागणी केली. त्यावेळी विद्युत रोशनाई  करण्यासाठी आवश्यक फंड नसल्याचे यादव यांनी सांगितले. त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जो काही फंड लागेल तो मी देतो, मात्र रायगड अंधारात ठेवू नका, अशा सूचना केल्या. त्यानुसार मागणीचे पत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्त्व विभागाला दिले. या मागणीवर पुरातत्त्व विभागाने तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार बुधवारी रायगडवर डॉ. शिंदे यांच्यामार्फत विद्युत रोशनाईचे साहित्य पोहच झाले. आणि बघता बघता शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला रायगड प्रकाशमान झाला.

छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडवरील राजसदर, होळीचा माळ येथील शिवरायांचा पुतळा आणि समाधीस्थळाला रोज पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. हा संकल्प उद्या शिवजयंतीच्या माध्यमातून सुरू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER