कर्जबाजारी शेतकरी ‘मातोश्री’बाहेर सहकुटुंब उपोषणाला

Uddhav Thackeray

मुंबई : बँकेच्या कर्जामुळे ‘मातोश्री’ (Matoshree)वर घुसण्याचा प्रयत्न करणारा रायगडचा शेतकरी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसला. महेंद्र देशमुख यांनी आपल्या लहान मुलीसोबतच पत्नीलाही घेऊन ‘मातोश्री’ गाठले, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

कर्जबाजारी शेतकरी महेंद्र देशमुख यांनी आपल्या लहान मुलीसह मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’मध्ये घुसण्याचा प्रयत्न जानेवारीत महिन्यात केला होता. पोलिसांनी धक्काबुक्की करत त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी न्याय देण्याचे आश्वासन शेतकऱ्याला दिले होते. मात्र अद्याप न्याय न मिळाल्याचे सांगत आपली पत्नी आणि मुलीसह ते मातोश्रीबाहेर उपोषणाला आला. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले.

फेब्रुवारीत अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी सांगितले की यांचे प्रकरण तडिस न्या, पण आजपर्यंत कोणीही न्याय दिला नाही. जून महिन्यापासून मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे प्रयत्न सुरु केले, मात्र कोणीही भेट होऊ दिली नाही, असा आरोप महेंद्र देशमुख यांनी केला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER