मुंबईत एनसीबीच्या पाच ठिकाणी धाडी; काही चित्रपट निर्मात्यांच्या घरी कारवाई सुरू

NCB

मुंबई :- अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि परिसरात पाच ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या घरी कारवाई सुरू आहे. एका ड्रग विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणात समोर आलेल्या ड्रग अँगलनंतर एनसीबीने सुरू केलेली कारवाई अद्यापही सुरूच आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, एनसीबीनं अंधेरी, खारघर येथे ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी धाड टाकली होती. एका ड्रग्ज विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, आजही एनसीबीने मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैराणे या भागात धाडी टाकल्या आहेत.

एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, “आम्ही ड्रग्ज विक्रेत्यांकडून सहा किलो मारिओना आणि मेफेड्रोन हे ड्रग्ज जप्त केले आहे. यात पाच संशयित ड्रग्ज विक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे.

बॉलिवूडमधील ड्रग्जप्रकरणी एनसीबीने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची चौकशी केली आहे. यामध्ये श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोन, रकुलप्रीत सिंग, सारा अली खान यांचा समावेश आहे. ड्रग्ज पुरवठ्याप्रकरणी यांची चर्चा झाल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यावरून त्यांना एनसीबीनं आपल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER