राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या घरावर धाड

anil bhosale

पुणे :  पुण्याच्या (Pune) राष्ट्रवादीच्या (NCP) आमदाराच्या घरावर छापे मारून आलिशान कार जप्त करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळाप्रकरणात पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले (Anil Bhosale) यांच्या (Pune Police Raids MLA Anil Bhosale House) घरी धाड टाकली. त्यांच्या दोन आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या.

तब्बल ७२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी आमदार भोसलेंवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याबाबत भोसलेंच्या घरावर छापे टाकत पोलिसांनी कारवाई केली. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे रिझर्व्ह बँकेने २०१८-१९ चे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यात ७१ कोटी ७८ लाख रुपये कमी आढळले होते.

त्यानंतर या बॅंकेचं संचालक मंडळ बरखास्त करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी आमदार अनिल भोसले यांच्यावर अपहार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे सहकार कायद्यातील तरतुदींनुसार नुकसानीला जबाबदार असलेल्यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. आमदार अनिल भोसले यांच्या गाड्यांव्यतिरिक्त त्यांच्या किमती वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आणखी काही जणांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात पुणे जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER