दाऊदच्या डोंगरीत घुसून धडक कारवाई, 12 ते 13 किलो ड्रग्स जप्त

raid David's mountain and seized 12 to 13 kg of drugs

मुंबई : दाऊद इब्राहिम (David Ibrahim) याचा खास हस्तक व माफिया करीम लाला याचा नातेवाईक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंकू पठाण याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली. यानंतर मुंबईतील दाऊदच्या डोंगरी परिसरामध्ये छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारी दरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांसह, दोन कोटी रुपयांची रोकड व शस्त्र मिळून आली आहेत.

यानंतरच्या कारवाईमध्ये शुक्रवारी एनसीबीकडून पुन्हा मुंबईत काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या दरम्यान पोलिसांना चिंकू पठाणकडे असलेली डायरी मिळून आली आहे. या डायरीमध्ये मुंबई शहरात अमली पदार्थांची तस्करी करणारे व अमली पदार्थांची मागणी करणाऱ्या ग्राहकांची यादी एनसीबीच्या हाती लागलेली आहे. यामध्ये काही उद्योगपती व सेलिब्रिटींची नावं असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आतापर्यंतच्या तपासानुसार मुंबईतून अमली पदार्थांच्या माध्यमातून दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा केला जात असल्याचे समोर येत आहे. दाऊदचा खास हस्तक चिंकू पठाण हा त्याच्या इतर अमली पदार्थ तस्करांसोबत मिळून मुंबईत अमली पदार्थांची विक्री करून दहशतवाद्याना आर्थिक पुरवठा करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये जवळपास 1500 कोटी रुपयांचे ड्रग्स मुंबई शहरात विकले गेले असून हवालामार्गे हा पैसा परदेशात पाठवण्यात आल्याचेही समोर आले आहे.

12 किलो अमली पदार्थ, 2 कोटी 80 लाखांची रोकड जप्त

एनसीबीने आतापर्यंत 12 किलो अमली पदार्थ जप्त केले असून यामध्ये 6 किलो एमडी व 1 किलो मेंटमाईनसह इतर अमली पदार्थांचा समावेश आहे. बुधवारपासून नवी मुंबई, भिवंडी, डोंगरी परिसरामध्ये केलेल्या कारवाईदरम्यान अमली पदार्थ व तब्बल 2 कोटी 80 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरामध्ये एका कारखान्यात या अमली पदार्थाचे उत्पादन घेतलं जात होतं. एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या चिंकू पठाणकडून मिळालेल्या माहितीवरून त्याचा जवळचा साथीदार आरिफ भुजवाला याच्या घरी एनसीबीच्या पथकाने छापेमारी केली असता इथून मोठ्या प्रमाणात रोकड व अमली पदार्थ मिळून आले आहे.

दरम्यान, एनसीबीचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी “डी” कंपनीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. दाऊदच्या डोंगरीत घुसून त्यांनी कारवाई केली होती. इतकंच नाही तर दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्याही आवळल्या होत्या. समीर वानखेडे यांनी डोंगरीतील ड्रग्जची फॅक्ट्री उध्वस्त केली. जी फॅक्ट्री उध्वस्त केली त्या लोकांचे अंडरवर्डशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER