राहुलची फलंदाजी पंजाबला तारक की मारक?

Maharashtra Today

आयपीएलमध्ये (IPL) 4 बाद 195 अशी आव्हानास्पद धावसंख्या उभारुनही दिल्लीविरुध्द रविवारी पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) पराभवाला के.एल.राहुलची (K.L.Rahul) 61 चेंडूतील 51 धावांची खेळी कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. त्याच्या या खेळीची तुलना दिल्लीसाठी शिखर धवनने केलेल्या 49 चेंडूतील 92 धावांच्या खेळीशी केली जात आहे आणि राहुलने थोड्या वेगाने धावा जमवल्या असत्या तर पंजाबच्या खात्यात आणखी 15-20 धावा पडल्या असत्या आणि सामन्याचा निकाल कदाचित वेगळा लागला असता अशी चर्चा आहे.

याच राहुलने राजस्थान राॕयल्सविरुध्द 50 चेंडूत 91 धावांची खेळी केली होती पण रविवारी दिल्लीविरुध्द त्याने एक बाजू लावून धरत 51 चेंडूत 61 धावा केल्या. स्ट्राईक रेट 119 चा राहिला. त्याचवेळी त्याचा सलामीचा साथीदार मयंक अगरवाल याने 36 चेंडूतच 69 धावा म्हणजे 191 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. हा फरक मोठा बोलका आहे आणि राहुलला एवढा बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज नव्हती असे जाणकार मानतात.

गेल्या आयपीएलपासून पाहिले तर 50 पेक्षा अधिक चेंडू खेळून 140 च्या कमी स्ट्राईक रेटने धावा केलेल्या पाच खेळींपैकी तीन खेळी राहुलच्या आहेत. आणि ते तिन्ही सामने पंजाबने गमावले होते हे उल्लेखनीय!

आयपीएल 2020 मध्ये राहुलने सात खेळी 40 पेक्षा अधिक धावांच्या खेळी केल्या होत्या पण त्यापैकी पाच खेळीत त्याचा स्ट्राईक रेट 130 पेक्षा कमी होता आणि पंजाबने त्या सातपैकी चार सामने गमावले होते. म्हणजे राहुल धावा करतोय पण त्या संघाला तारक ठरण्याऐवजी मारक ठरताहेत. त्यामुळे दुसऱ्याच षटकात स्टिव्ह स्मिथने त्याचा झेल घेतला असता तर उलट पंजाबसाठी फायद्याचे ठरले असते अशी चर्चा आहे.

कर्णधार या नात्याने जबाबदारीने खेळत एक बाजू लावून धरावी या भूमिकेतून तो कमी धोके पत्करताना दिसतो पण ते संघासाठी उलट तोट्याचे ठरत आहे हे त्याने ध्यानात घ्यायला हवे असे तज्ज्ञ म्हणतात.

विशेष म्हणजे पंजाब किंग्जने गमावलेल्या 10 सामन्यांमध्ये राहुलने अर्धशतकाच्यावर खेळी केल्या आहेत पण त्या संघाच्या कामी आलेल्या नाहीत. म्हणून राहुलने आपल्या फलंदाजीची रणनिती बदलणे गरजेचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button