राहुल गांधींचीही इंदिरा, राजीव आणि सोनिया गांधींप्रमाणेच गुजरातमधून प्रचारास सुरुवात

लाल डुंगरी (दक्षिण गुजरात) : गुजरातमधील धरमपुर येथील लाल डुंगरी या आदिवासी गावात जेथून राहुल गांधी यांची आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1980 साली निवडणुक प्रचारास सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे पिता राजीव गांधी यानी व आई सोनिया गांधी 2004 साली लोकसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात केली होती आणि सत्ता प्राप्त केली होती. त्याच लाल डुंगरी येथून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीची गुरुवारपासून सुरवात करतील.

लाल डुंगरी (लाल कांदा) येथून सुरुवात करणे देशाच्या सत्ता प्राप्तीसाठी शुभ संकेत असल्याची पक्षाची मान्यता आहे. दक्षिण गुजरातच्या दूरवरच्या ग्रामीण भागात काँग्रेसचा पंजा हे चिन्ह माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे असल्याचा समज आहे.

येथे काँग्रेस पराभूत झाली असली तरी या भागात काँग्रेसचे ऐेतिहासिक महत्व आहे. राज्याचे प्रमुख जितू वाघानी यांच्या नेतृत्वाखाली क्लस्टर मिटींगसाठी सुमारे 4 हजार कार्यकर्ते घेऊन राहुल गांधी यांनी जनआक्रोश रॅली काढली होती. या रॅलीच्या एक दिवस अगोदरच शेजारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप धर्मापुरी येते बुधवारी जोरदार कार्यक्रम करण्यात आला.

ही बैठक धर्मापुर येथील राजचंद्रा आश्रम सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. दक्षिण गुजरातच्या या आदिवासीबहुल तीन लोकसभा मतदार संघातील पक्ष कार्यकत्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल या लढाऊ विमान खरेदी संदर्भात कॅगने क्लिन चीट दिली आहे. जेव्हा कि ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात काँग्रेस नेते गुंतले असल्याचे फडणवीस म्हणाले.

दरम्यान या भागातील आदिवासींची भरपूर पिकं देणारी जमीन बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्यात आली आहे. त्यामुळे येथील लोकांच्या मनात आपली जमीन गेल्याचा सरकारविरोधात असंतोष खदखदत आहे. हे प्रकरण गुजरात उच्च न्यायायालात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी याविरुद्ध कडक शब्दात सरकारला सुनावेल, असे अपेक्षित आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गुजरातमधील या भागाला महत्व देण्यासाठी काँग्रेस पक्षाची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक येथे होण्याची शक्यता आहे. काँग्रेसशासीत राज्य सोडून या भागात काँग्रेसचे बैठक घेणे हे याकडेच अंगुलीनिर्देश करत आहे.

याशिवाय लाल डुंगरीची निवड म्हणजे राहुल गांधी इंदिरा गांथी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल करत असल्याचे लक्षण आहे.

गुजरातचे भाजप प्रदेश सरचिटणीस भरतसिंग परमार यानी धरमपुर येथील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रॅलीची घोषणा केली होती. काँग्रेसच्या रॅलीच्या आधीच आमची बैठक ठरली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने याभागातील 5 फेब्रुवारीच्या जन आक्रोश रॅलीची घोषणा केली होती. काँग्रेसने लाल डुंगरी येथील मोठी रॅली करण्यासाठी राज्याच्या युनिटने 75 आमदारांना एकत्रित केले होते.

गुजरात काँग्रेसचे प्रमुख अमित चावडा आणि विरोधी पक्ष नेते परेश धनानी वलसाड येथील जिल्हा मुख्यालयात पूर्व तयारीची व्यवस्था बघण्यासाठी येथे तळ ठोकून होते.