तेवटीयाला वाटत होते मस्करीच चाललीय!

Rahul Tewatia

“तेरा इंडिया टीम मे सिलेक्शन हो गया है”, युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) त्याला फोनवर सांगत होता पण त्याला वाटत होते हा मस्करी करतोय. एकतर तो अर्धवट झोपेतच होता आणि दुसरे म्हणजे चहल सांगत असला भारतीय संघात तुझे सिलेक्शन झालेय तरी त्याचा विश्वास बसत नव्हता, त्याचा विश्वास तेंव्हाच बसला जेंव्हा चहलने त्याला फोनवरच बातमी दाखवली, हा मजेशीर तेवढाच रोमांचकारी अनुभव आहे राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) खेळाडू राहुल तेवटीयाचा (Rahul Tewatia). इंग्लंडविरुध्दच्या टी-20 मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्याचे फळ त्याला मिळाले आहे.

हरियाणाचा लेग स्पिन गोलंदाजी करणारा तेवटीया हा अष्टपैलू असून किंग्ज इलेव्हन पंजाबविरुध्द त्याने आपल्या तडाखेबंद फलंदाजीने सामना जिंकून दिला होता. शेल्डन काॕट्रेलला त्याने लगावलेले पाच षटकार लोक विसरलेले नाहीत. तेंव्हापासून राहुल तेवटीया हे नाव लोकांच्या पक्के लक्षात राहिले आहे.

चहलने त्याला ही आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केला तेंव्हा त्याच्या लक्षात आले की, राहुलला त्याची निवड झाल्याची कल्पनाच नाही. मुळात टी-20 मालिकेसाठी शनिवारी संघ निवडला जाणार आहे हेच त्याला माहित नव्हते.

राहुलने सांगितले,” युदीभाईने मला कळवले तेंव्हा माझी पहिली प्रतिक्रिया होती की, तो मस्करी करत असावा. मला निवड होईल असे वाटतच नव्हते. मोहित भैया शर्मा यानेसुध्दा माझ्या रुममध्ये येऊन मला ही बातमी दिली. राहुल सध्या विजय हजारे ट्रॉफीचे सामने खेळण्यात व्यस्त आहे.

तो म्हणतो की आयुष्यात आव्हाने येतच असतात. हरियाणाकडे आधीच तीन फिरकीपटू आहेत जे देशासाठी खेळले आहेत. अमीत मिश्रा, युझवेंद्र चहल आणि जयंत यादव! लोकांच्या नजरेत मी आयापीएलनंतर आलो. मी ठरवलेले होते की संधी मिळाली तर तिचा फायदा नक्की उचलायचा. चांगली कामगिरी करत राहिलो तर भारतीय संघात निवड होईल असे वाटतच होते.

आता पुढचा मार्ग अधिक कठीण आहे याची त्याला जाणिव आहे. एवढ्या नावाजलेल्या खेळाडूंसोबत राहायला मिळणार या कल्पनेनेच तो रोमांचित आहे. ते कसे काम करतात, कशी तयारी करतात हे जवळून बघायला मिळणार आहे. संघव्यवस्थापन व निवडकर्त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER