राहुल – प्रियंकाना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात

Rahul Gandhi

दिल्ली : राहुल (Rahul Gandhi) आणि प्रियंका (Priyanka Gandhi) उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना घेऊन पोलिसांची गाडी घटनास्थळावरून रवाना झाली आहे.

राहुल आणि प्रियंकासोबत काँग्रेसचे कार्यकर्तेही होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी पोलिसांनी कारकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांची शुल्लक झटापट झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केला.

राहुल गांधी म्हणाले – पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडले. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का ? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का ? आमचे वाहन थांबवण्यात आले म्हणूनच चालत निघालो होतो. राहुल गांधी यांनी ट्विट करून योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना सोबत करण्यासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत निघाले. हाथरस जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. करोनाच्या साथीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER