राहुल-गेलचा वेगवान अर्धशतक, पंजाबने बंगळुरूचा ८ गडी राखून केला पराभव

Punjab beat Bangalore by 8 wickets

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी झाला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात स्पर्धेतील सर्वात वाईट संघ असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आठ गडी राखून पराभव करून स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविला. विशेष म्हणजे पंजाबचा दोन्ही विजय आरसीबीच्या विरोधात झाले आहेत. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरच्या षटकांत विराट कोहली आणि क्रिस मॉरिसने वेगवान फलंदाजीच्या जोरावर संघाने पंजाबविरुद्ध विजय मिळवण्यासाठी १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. विराटने संघासाठी सर्वाधिक ४८ धावा केल्या तर मॉरिसने ३ षटकारांच्या मदतीने ८ चेंडूत २५ धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

मागील सामन्याप्रमाणे विराट कोहलीने समान संघ मैदानात उतरवले आहे, तर केएल राहुलने या सामन्यासाठी तीन बदल केले आहेत. त्याने ख्रिस गेल, दीपक हूडा आणि मुरुगन अश्विन यांना मनदीप सिंग, प्रभासीमरण सिंग आणि मुजीब उर रेहमान यांच्या जागी घेतले आहे. या हंगामात या दोन संघांमधील हा दुसरा सामना आहे. २४ सप्टेंबर रोजी दोन्ही संघांमधील सामना प्रथमच खेळला गेला. यामध्ये केएल राहुलच्या नेतृत्वात किंग्ज इलेव्हन पंजाबने शानदार ९७ धावांनी विजय मिळविला. त्या सामन्यात राहुलने नाबाद १३२ धावा केल्या होत्या आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने त्याचा झेल दोनदा सोडला होता. या सामन्यानंतर आरसीबीने स्पर्धेत जबरदस्त पुनरागमन केले असले तर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने आपली लय पूर्णपणे गमावली आहे.

पंजाबचा डाव, केएल आणि ख्रिस गेलचे अर्धशतक
पंजाबची पहिली विकेट मयंक अग्रवालच्या रूपात पडली आणि त्याने खूप चांगला डाव खेळला. मयंकला चहलने ४५ धावांवर बोल्ड केले. पहिल्या विकेटसाठी त्याने केएल राहुलबरोबर ७८ धावांची भागीदारी रचली. क्रिस गेलने ४५ चेंडूत ५३ धावा केल्या आणि तो धावबाद झाला. कर्णधार केएल राहुल ४९ चेंडूंत ६१ धावांवर नाबाद राहिला तर पूरण एक चेंडूत ६ धावा काढून नाबाद पॅव्हेलियन परतला.

हेड टू हेड
या दोन संघांत आतापर्यंत एकूण २५ सामने खेळले गेले असून यामध्ये १३ सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब आणि १२ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजय मिळविला आहे. मागील हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले होते आणि दोन्ही सामने किंग्ज इलेव्हन पंजाबने जिंकले होते. तर या हंगामात यापूर्वी एक सामना झाला होता, जो किंग्ज इलेव्हन पंजाबने जिंकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER