राहुल गांधी यांच्या कार्यशैलीमुळे भाजपाला होते मदत; राजदचा काँग्रेसला टोमणा

- बिहार निवडणूक निकालानंतर नेत्यांमध्ये जुंपली

Rahul Gandhi-Shivanand Tiwari

पाटणा : बिहारमध्ये महाआघाडीची सत्ता तोडक्यात हुकली. राजदचे तेजस्वी यादव याची मुख्यमंत्री होण्याची संधी निसटली. यासाठी महाआघाडीतील घटकपक्ष काँग्रेसला जबाबदार मानत आहेत. राजदचे वरिष्ठ नेते शिवानंद तिवारी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) टीका करताना म्हणाले – बिहार निवडणूक सुरु असताना राहुल गांधी शिमला येथे गेले होते. सहलीचा आनंद लुटत होते. पक्ष अशा प्रकारे चालवला जातो का? राहुल गांधी यांच्या कार्यशैलीमुळे भाजपाला मदतच होते.

या निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवल्या. राहुल गांधींनी फार सभाही घेतल्या नाहीत बिहारमध्ये फक्त तीन दिवस आले होते. प्रियंका गांधी तर बिहारमध्ये फिरकल्याच नाहीत. कारण बिहारशी त्यांचा फारसा परिचय नाही असेही शिवानंद तिवारी म्हणाले.

तिवारी याना काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी उत्तर दिले – “शिवानंद तिवारी ज्येष्ठ आहेत आणि असे विधान करण्यापूर्वी विचार करायला हवा. काँग्रेस राजद नाही. राजद हा प्रादेशिक पक्ष असून त्याचे नेते बिहारपुरते मर्यादित आहेत. राहुल गांधी म्हणाले होते की जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा ते बिहारमध्ये येतील आणि त्यांनी तसे केले. ते आरजेडीच्या नेत्यांसारखे काम करू शकत नाहीत.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, बिहारच्या निवडणुकीत एनडीएने १२५ जागा मिळवत पुन्हा सत्ता मिळवली आहे. महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. त्यांचे बिहारमधील सत्तेचे स्वप्न भंगले. या निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवल्या आणि १९ जिंकल्या. जास्त जागा लढवून काँग्रेसने कमी जागा जिंकल्या या नुकसानीमुळे महाआघाडीच्या हातून सत्ता निसटली, असा महाआघाडीतील इतर पक्षांचा आरोप आहे. महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर, काँग्रेसला १९ जागांवर व डाव्यांना १६ जागांवर विजय मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER