राहुल गांधींचा व्हिडीओ हे नाटक; मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार- मायावती

Mayawati- Rahul Gandhi

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी सुखदेव विहार उड्डाणपुलावरून आपापल्या राज्यांत जाण्यासाठी निघालेल्या अशाच काही मजुरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी बोलले. राहुल गांधी यांच्या या गरिबांबाबत सहानुभूती दाखवण्याच्या प्रयत्नाला नाटक म्हणून बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी काँग्रेसवर टीका केली.

ही बातमी पण वाचा:- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी घेतली मजुरांची मुलाखत

मायावती म्हणाल्या की, राहुल गांधींचा हा व्हिडीओ म्हणजे नाटक आहे. सध्या देशात मजुरांची जी काही अवस्था झाली आहे त्याला काँग्रेसच जबाबदार आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. ‘लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणे हे नाटक असल्याचे अधिक जाणवते. हा व्हिडीओ शेअर करण्यापेक्षा काँग्रेसने प्रत्यक्षात किती लोकांची मदत केली हे सांगितले असते तर बरे झाले असते.’ असे मायावती यांनी म्हटले आहे.

 

‘आज कोरोना लॉकडाऊनमुळे देशातील स्थलांतरित मजुरांची जी अवस्था आहे, जी दुर्दशा झाली त्याला काँग्रेसच जबाबदार आहे. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका मोठ्या कालावधीसाठी देशात काँग्रेसची सत्ता होती. एवढ्या मोठ्या शासनकाळात जर काँग्रेसने या मजुरांच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा सोडवल्या असत्या तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती. ’ असेही मायावती यांनी म्हटले आहे.

याच मुद्यांवर काही दिवसांपूर्वी मायावती यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती. लॉकडाऊनदरम्यान देशभरात दलित आणि मागास वर्गातील लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळेच देशातील अनेक भागांतील लोक पलायन करत आहेत. पलायन करणाऱ्यांमध्ये ९० टक्के लोक दलित आणि अतिमागास प्रवर्गातील आहेत, असा उल्लेख मायावतींनी केला होता. राज्य सरकारांकडून दलित आणि गरिबांची उपेक्षा करण्यात आली आहे. सरकारांनी त्यांच्यासाठी कोणतीही वेगळी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे ते आपल्या घराकडे पलायन करत आहेत. कोरोनामुळे दलित आणि गरिबांची परिस्थिती हलाखीची झाली असून, त्याकडे केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER