PMCares फंडचे व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी ‘दोनों फेल हैं; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

Modi vs Rahul Gandhi

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona virus) दुसर्‍या लाटेत वैद्यकीय आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे रूग्णांना जीव गमावावा लागत आहे. या लाटेत रूग्णांना ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय ऑक्सिजनची मोठी गरज आहे. पीएम केअर फंडअंतर्गत राज्यांना व्हेंटिलेटर दिले, परंतु व्हेंटिलेटरमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर (Thackeray Govt) निशाणा साधला.

“पीएम केअरचे व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान यांच्यात अनेक समानता आहेत. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात. हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात. संकटाच्यावेळी दोघांनाही शोधणे कठीण आहे.” अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे मोदी सरकारवर केली आहे.

मागील आठवड्यात, भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात व्हेंटीलेटर्स खराब झाल्याचे प्रकरण समोर आले होते. डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहिले, यात स्पष्ट केले की, ‘पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर बिघडलेले आहेत. ऑक्सिजनचा प्रवाह होत नाही, दबाव निर्माण होत नाही, मशीन चालू असतानाच बंद पडते. अशा परिस्थितीत रुग्णाचे प्राण वाचवणे अवघड आहे.’

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button