राहुल गांधींचे वक्तव्य योग्यच ;राज्यात कॉंग्रेसचे नाही महाविकास आघाडीचे सरकार – नवाब मलिक

Nawab Malik - Rahul Gandhi

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य योग्यच आहे कारण महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार नाही तर महाविकास आघाडीचे सरकार आहे असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार नाही असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी त्यांच्या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट केला आहे.

तीन पक्षांनी स्थापन केलेले हे महाविकास आघाडी सरकार आहे. तिन्ही पक्ष जनतेच्या सेवेसाठी एकजूट आहोत आणि कोरोना संकटाच्या काळात आम्ही एकजुटीने काम करत आहोत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER