‘कोरोना म्यूटेशन ट्रॅक’ करण्याचा दिला सल्ला; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली :- देशातील कोरोना (Corona) परिस्थितीला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार केली आहे. राहुल गांधी केंद्रावर टीकेचा भडीमार करताना मोदींना (PM Modi) काहीसे सल्लेही देत असतात. आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी ‘कोरोना म्यूटेशन ट्रॅक’ (Corona Mutation Track) करण्याचा सल्ला दिला आहे. याचबरोबर सर्व प्रकारच्या म्यूटेशनवर लवकरात लवकर वॅक्सीन चाचणी करावी, असे सांगितले आहे. तसेच लसीकरण वेगाने करण्याची आग्रही मागणी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केली आहे.

“कोरोना स्थिती पाहता तुम्हाला पुन्हा पत्र लिहावे लागत आहे. देशावरील संकट लक्षात घेता भारतीय नागरिकांना प्राथमिकता देणे गरजेचे आहे. नागरिकांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी जे शक्य होईल ते करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. केंद्राच्या अपयशामुळेच आता देशात लॉकडाऊनची स्थिती उद्भवली आहे.” असे राहुल गांधींनी पात्रात नमूद केले आहे. हे पत्र काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट केले आहे.

राहुल गांधी यांनी पत्र लिहिण्यापूर्वी ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. “‘सेंट्रल व्हिस्टा’ हा एक गुन्हेगारी स्वरूपातील अपव्यय आहे. लोकांच्या जीवनाचा प्रश्न असताना नवे घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको.” असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारला लगावला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button