राहुल गांधींचा मोठा निर्णय; अनेक नेते, पत्रकारांना केले अनफॉलो

Rahul Gandhi

नवी दिल्ली :- दररोज ट्विट करत भाजपला कोंडीत पकडणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोठा निर्णय घेतला. मंगळवारी त्यांनी दिवसभरात अनेक नेते आणि पत्रकारांना ट्विटरवरून अनफॉलो केलं आहे. त्यात काँग्रेसचे नेते आणि जवळच्या काही पत्रकारांचीही नावे आहेत. राहुल गांधींनी ट्विटरवरून नेते आणि पत्रकारांना अनफॉलो केल्याने राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा रंगली आहे. राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाउंटवरून मंगळवारी अनेकांना अनफॉलो करण्यात आले आहे. त्यात काँग्रेस नेत्यांचाही समावेश होता. एवढेच नव्हे तर वायनाड येथील त्यांच्या पक्ष कार्यालयात काम करणाऱ्यांनाही अनफॉलो करण्यात आले आहे.

राहुल गांधी यांचं अकाउंट रिफ्रेश केलं जात आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच काही लोकांची यादी तयार केली जाणार आहे, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं. नव्या लिस्टमधील लोकांना राहुल गांधी फॉलो करतील. तसेच ज्या लोकांना अनफॉलो करण्यात आलं आहे, त्यापैकी काही लोकांना पुन्हा फॉलो केलं जाणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी अनेक लोकांना अनफॉलो केल्याने त्यावर जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक जण वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. ट्विटरवरून अनेकांना अनफॉलो करण्यामागे राहुल गांधी यांची काही योजना आहे का? असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे.

मात्र, काँग्रेसने दिलेल्या स्पष्टीकरणावरून या चर्चांना पूर्णविराम लागला. काँग्रेसकडून खुलासा करण्यात आला असला तरी अजूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत. या कृतीला राहुल गांधी यांच्या भविष्यातील राजकीय रणनीतीचा भाग म्हणूनही बघितलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी हे ट्विटरवर आक्रमक आहेत. कोरोनाकाळात त्यांनी ट्विटरवरूनच सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर विरोधकांनीही त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राहुल यांनी कोविडला मोविड म्हटलं आणि मोदींवर थेट निशाणा साधला. तेव्हा त्यांचं ट्विटर अकाउंट वादात आलं होतं. ट्विटमधील भाषेवर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला होता. परंतु, कोरोनाची दुसरी लाट येण्यास केवळ मोदी कारणीभूत आहेत. त्यामुळे कोविडला मोविड नाव देण्यात आल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button