राजीव सातव यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी राहुल गांधी हिंगोलीत येणार

हिंगोली : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव ( rajiv satav ) यांचे १६ मे रोजी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या निधनाने काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. तरुण नेता गमावल्याने काँग्रेस नेतृत्वालाही धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे राजीव सातव यांच्या कुटुंबांची भेट घेणार आहेत.

ते २५ मे रोजी हिंगोलीत येणार असल्याची माहिती आहे. सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. मी माझा मित्र गमवला आहे, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button