राहुल गांधी उद्या ‘नाटकबाजी’साठी पंजाबमध्ये येणार; बादल यांचा टोमणा

Badal Scoffs & Rahul Gandhi

अमृतसर : वादग्रस्त कृषी विधेयकाच्या निषेधात पंजाब आणि हरियाणात अनेक ठिकाणी उद्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंजाब व हरियाणातील शेतकरी आंदोलनांमध्ये भाग घेण्यासाठी जाणार आहेत. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी राहुल यांच्या या दौऱ्यावर – राहुल गांधी (Rahul Gandhi) उद्या ‘नाटकबाजी’साठी पंजाबमध्ये येणार, अशी टीका केली आहे.

राहुल येथे ट्रॅक्टर रॅलीत भाग घेणार आहेत. याबाबत राहुलवर टीका करताना सुखबीर सिंग बादल म्हणाले – ‘पंजाबमध्ये उद्या राहुल गांधी नाटकबाजी करण्यासाठी येणार आहेत. या कृषी विधेयकांची चर्चा प्रथम काँग्रेसच्या राजवटीतच सुरू झाली होती. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात, सत्तेत आलो तर खासगी कृषी बाजारपेठा उभारू, असे आश्वासन दिले होते. याची आठवण बादल यांनी करून दिली.

मोदी सरकारच्या तीन कृषी विधेयकांचा निषेध म्हणून अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) घटक असलेल्या अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत असल्याचेही जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER