राहुल गांधीचा ‘भारत बंदला पाठिंबा ; सत्याग्रहानेच अत्याचार, अन्याय व अहंकाराचा अंत होईल

Rahul Gandhi

मुंबई: कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची (Bharat Band) हाक दिली असून देशभरात अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिमाण होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या वेशीवर केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळीच शेतकऱ्यांकडून गाझीपूर सीमेवर राष्ट्रीय महामार्ग ९ रोखण्यात आला होता. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनीही (Rahul Gandhi) आजच्या ‘भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , भारताचा इतिहास साक्षी आहे की , सत्याग्रहानेच अत्याचार, अन्याय व अहंकाराचा अंत होतो , असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER