…म्हणून यापुढे मी RSS चा संघ ‘परिवार’ असा उल्लेख करणार नाही; राहुल गांधींचे ट्विट बोचरी टीका

Maharashtra Today

मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) पुन्हा निशाणा साधला आहे . या पुढे आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘संघ परिवार’ म्हणणार नाही असा टोलाही राहुल यांनी ट्विटरवरुन लगावला आहे.

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , . “माझ्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संघटनांना संघ परिवार असं म्हणणं योग्य ठरणार नाही. परिवार (कुटुंब) म्हटल्यावर तिथे महिलांचा आणि वयस्कर व्यक्तींचा आदर केला जातो. या व्यक्तींबद्दल आदर आणि प्रेमाची भावना असते. असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये घडत नाही. त्यामुळे मी यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघ परिवार म्हणणार नाही,” असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ख्रिश्चन महिला पाद्र्यांवर धर्मप्रसार करत असल्याचा आरोप करत ट्रेनमधून उतरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी हे ट्विट केले आहे. या घटनेचाही राहुल गांधींनी विरोध केला असून हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं हे कृत्य म्हणजे संघाचा प्रपोगांडा राबवण्याचा प्रयत्न असल्याचा टोला राहुल यांनी लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER