‘…उसने माँ गंगा को रुलाया है’; राहुल गांधी यांचा मोदींना टोमणा

दिल्ली : काही दिवसांपासून गंगा नदीत (River Ganga) प्रेत वाहून येत आहेत. यावरून खळबळ उडाली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये अचानक मृत्यूचे प्रमाण वाढल्याने व गावांमध्ये लाकडांचा तुटवडा असल्याने लोक शव नदीत सोडत आहेत, अशी माहिती आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यावरून – ‘जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है’ असे ट्वीट करून पंतप्रधान मोदींवर (PM Modi) टीका केली.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गंगा घाटावर पूजा केली होती. त्यावेळेस ते ‘माँ गंगेने मुझे बुलाया है’ असे म्हणाले होते; त्याचा संदर्भ घेऊन राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button