केंद्राच्या अपयशी धोरणांमुळे कोरोनाची दुसरी लाट; सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी : राहुल गांधी

नवी दिल्ली :- देशात कोरोनाचा (Corona crises) कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांनी एक कोटीचा टप्पा पार केला असून दीड लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा मोदी सरकारवर (Modi Govt) हल्लाबोल केला आहे. “केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे.” असे म्हणत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. “केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर दुसरी लाट निर्माण झाली आहे आणि प्रवासी कामगारांना पुन्हा परतावे लागत आहे. सामान्य माणूस आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी लसीकरण वाढवण्याव्यतिरिक्त, त्यांच्या हातात पैसे देणे आवश्यक आहे. पण अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे.” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

“कोरोना लसींची निर्यात थांबवा. वाढत्या कोरोना संकटात लसींची कमतरता एक गंभीर समस्या आहे. आपल्या देशवासीयांना संकटात टाकून लसींची निर्यात योग्य आहे का? केंद्र सरकारने पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करावी. सर्वांना मिळून या महामारीला हरवायचे आहे.” असे राहुल गांधी ट्विटद्वारे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button