… मोदी सरकार हे काम मोफत करते! राहुल गांधींचा टोमणा

नवी दिल्ली :- इंधन दरवाढीसाठी (petrol-diesel-price-hike) मोदींवर (Modi Govt) टीका करतानाही काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी इंधन दरवाढीचा संबंध – तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करतंय, असे म्हणत मोदींच्या ‘मित्रां’शी जोडला.

या संबंधात उल्लेखनीय आहे की, गेल्या कित्येक दिवसांपासून दररोज इंधन दरवाढ सुरू आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली. पंपचालकांनी लगेचच विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत पेट्रोलियम उत्पादनांवर उत्पादन शुल्क कमी करण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचे सांगितले. यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारवर टीका केली.

राहुल गांधी ट्विट केले – पेट्रोल पंपावर गाडीत तेल भरताना तुमची नजर वेगाने धावणाऱ्या मीटरकडे जाईल, तेव्हा हे लक्षात घ्या की, कच्च्या तेलाचे दर वाढलेले नाहीत, तर उलट कमी झाले आहेत. पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर आहे. तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचे महान काम मोदी सरकार मोफत करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER