राहुल गांधी प्रियंका व ज्योतिरादित्यला म्हणाले, स्थानिक नेत्यांना प्राधान्य देणे ही तुमची जबाबदारी

rahul1

लखनऊ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लखनऊ येथील रोड-शोच्या दरम्यान सडकून टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस आता प्रत्येक राज्यात फ्रंटफूटवर खेळणार असून भाजप विचारधारेला हरविणआर आहे. स्थानिक नेत्यांना प्राधान्य देणे ही तुमची जबाबदारी असल्याची सूचना त्यांनी प्रियंका आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली.

मोदींचा पोकळपणा आता उघड झाला असून काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात कायापालट करण्यासाठी लढा देणार असल्याचे ते म्हणाले. प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी एक भावुक पोस्ट करत प्रियांकांना शुभेच्छा दिल्या आहेत. लखऊतल्या शक्ती प्रदर्शनाच्या आधी करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये वाड्रा यांनी म्हटले आहे कि, देशाची सेवा करणे हे तिचे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रियांकांना आता देशाच्या स्वाधीन करत आहोत असे रॉबर्ट वाड्रा यांनी लिहिले आहे.