मला कोणीच अडवू शकत नाही ; राहुल गांधींचा पीडितेच्या कुटंबाला भेटण्याचा निर्धार

Priyanka Gandhi-Rahul Gandhi

मुंबई : हाथरसमध्ये (Hathras) एका दलित मुलीवर बलात्कार करण्यात आला. तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर उपरादरम्यान या मुलीचा दिल्लीतल्या रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत.गुरुवारी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या (Hathras Gang Rape) कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) ताफा घेऊन निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अर्ध्या रस्त्यात थांबवलं. यावेळी चालत निघालेल्या राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्याचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले होते. त्यानंतर आता राहुल गांधी (Rahul Gandhi) पुन्हा एकदा हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या यामाध्यमातून दिली .

जगातील कोणतीही ताकद मला हाथरस येथील दुखी कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही,” असे ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. “पीडित मुलीबरोबर आणि कुटुंबासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी केलेला व्यवहार मला तर मान्य नाहीच शिवाय कोणत्याही भारतीयांना हा व्यवहार पटला नसेल,” असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER