राहुल गांधी यांची व्हिलेज कुकिंगला भेट : खाल्ली मशरुम बिर्याणी

rahul-gandhi-prepares-raita-eats-mushroom-biryani-with-tamil-nadus-village

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सध्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधत आहेत, विकासकामांचा आढावा घेत आहेत. आता राहुल गांधी एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत.

व्हिलेज कुकिंग या यूट्यूब चॅनेलवर त्यांचा एक व्हीडिओ प्रदर्शित झाला आहे. व्हिलेज कुकिंग (Village cooking) या लोकप्रिय पाककृती यूट्यूब चॅनेलला भेट देऊन त्यांच्या एका व्हीडिओमध्ये ते सहभागी झाले आहेत. राहुल गांधी गेल्यामुळे व्हिलेज कुकिंगच्या सदस्यांनाही आनंद झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. राहुल गांधींनी मशरुम बिर्याणीसोबत (Mushroom-biryani) तोंडी लावायला कोशिंबीर तयार करण्यासाठी मदत केली आहे. दही, कांदा, मीठ कालवून त्यांनी कोशिंबीर तयार केली.

मशरूम बिर्याणी तयार झाल्यानंतर व्हिलेज कुकिंग टीमच्या सदस्यांबरोबर पंगतीला बसून गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतला. खेड्यातील या लोकांना पाठबळ दिल्याबद्दल धन्यवाद अशा प्रतिक्रिया टीम व्हिलेज कुकिंगने दिली आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा भेटण्याचं आश्वासन देऊन टिम व्हिलेज कुकिंगच्या टीमचा निरोप घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER