राहुल गांधी देशासाठी ‘घातक’ बनत आहेत! – निर्मला सीतारामन यांघी टीका

Nirmala Sitharaman & Rahul Gandhi

नवी दिल्ली : घटनात्मक पदांवर काम करणाऱ्यांचा सतत अवमान करणे, विविध विषयावर दिशाभूल करणारी माहिती देणे यामुळे राहुल गांधी देशासाठी घातक बनत चालले आहेत अशी टीका अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केली. त्यासाठी त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना उद्देशून ‘डूमस्‌डे मॅन’ शब्द वापरला.

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी ही टीका केली. त्या म्हणाल्या की, कॉंग्रेसचे माजी प्रमुख विविध विषयांवर खोटी माहिती व समज पसरवत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांवर सरकारकडून दिली जाणारी उत्तरेही ऐकण्याची क्षमता त्यांच्यात नाही. आपल्याला कॉंग्रेस नेत्यांच्या या दोन धारणा लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांचा लोकशाहीनियुक्त सरकारवरील विश्‍वास पूर्णत: नाहींसा झाला आहे.

राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा संदर्भ देऊन सीतारामन यांनी सांगितले की मी अर्थसंकल्पावरील भाषणाचा पाया तयार करत आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांवरच मते व्यक्त केली पण, अर्थसंकल्पावर एक शब्दही बोलले नाहीत. अर्थसंकल्पातील किमान दहा मुद्‌द्‌यावर ते बोलतील अशी माझी अपेक्षा होती पण त्यांनी निराशा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER